DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – प्रभु तडवी
अक्कलकुवा: महाराष्ट्र वनविभाग खापर, वनविभाग गुजरात, आणि खापर दूरक्षेत्र पोलीस, सोबत खापरचे नागरीक यांनी गस्त घालत एक बिपट्याला सुरक्षीत पिंजऱ्यात केला जेर बंद करून वन्य प्राणी याच्या प्रती माणुसकी जोपासली, मागील गेले दोन दिवसापासून खापर व लगतच्या गुजरात परीसरात बिपट्या दिसल्याच्या बातम्या होत्या, त्यातच खापर गो शाळेतील दोन गायीना चावा घेत बिपट्या असल्याची बातमी खरी ठरली त्यामुळे खापरचे सुजाण नागरीक चिंताग्रस्त होवुन रोष निर्माण झाला होता तसेच प्रशासन सुस्त आहे म्हणून प्रशासनवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते
पत्रकार आणि नागरीक प्रशासन काय कार्यवाही करते याबाबत आढावा घेत होते, त्या अनुशंघाने खापर दूरक्षेत्र प्रभारी उल्हास ठिंगळे, यांनी वेळोवेळी नागरिकांच्या तक्रारी ऐकून वनविभाग खापरचे गवळी साहेब यांना कळवून पिंजरा लावण्यास सूचित केले होते तसेच शेजारचे गुजरात वन विभाग यांना देखील पिंजरा लावण्यास विनंती केली होती त्यामुळे खापर, ब्राम्हणगाव, कवली, व शेजारील गुजरात राज्यात नवागाव,गुलीउमर, चाटवड, असे ठिकाणी जिथे बिपट्या दिसला तेथे बदलून बदलून पिंजरा लावण्यास सुचवले होते आणि पिंजरा लावण्यात आला होता त्यामुळे खापर दूरक्षेत्र प्रभारी उल्हास ठिंगळे सोबत पोलीस हवालदार संजय सुर्यवंशी, निलेश वसावे, सतिष वळवी खापर गो शाळेचे दिगंबर पाटील सोबत खापरचे सुजाण नागरीक हिरालाल अहिरे, दिनेश ढोले, सुनिल कुंभार, शोएब काझी, असे बिपट्याच्या शोधात गेले दोन दिवस डोळ्यात तेल घालून परीसरात गस्त घालत होते त्यात वन विभाग खापर आणि गुजरात यांनी बिपट्या पकडण्यास पिंजरा लावला होता त्याला काल सकाळी यश आले वन विभाग गुजरात यांनी लगतच्या गुजरात राज्यत चाटवड परीसरात लावलेल्या पिंजऱ्यात आखेर एक बिपट्या पक्कडला गेला त्यामूळे खापर परिसरातीलचाटवड नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.