DPT NEWS NETWORK ✍️
अक्कलकुवा: सन 2023/24 या वर्षाच्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीत योगेश्वर बुवा यांची जिल्हाध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी केली आहे . तर सचिव पदी प्रभू तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे ॲड. रूपसिंग वसावे अक्कलकुवा जिल्हा कायदेशीर सल्लागार , केवलसिंह राजपूत जिल्हा उपाध्यक्ष ,विजय वळवी सहसंघटक, रमेश पाटील उपाध्यक्ष, चेतन इंगळे सहसचिव, रवींद्र पाडवी मुख्य संघटक, मंगेश वळवी उपाध्यक्ष, गिरधर मोरे कार्याध्यक्ष, महेश पाटील उपाध्यक्ष, प्रशांत राजपूत संपर्कप्रमुख ,सुमित्रा वसावे महिला मुख्य संघटक,सईद कुरेशी उपाध्यक्ष यांची नुकतीच नियुक्ती नंदुरबार जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी केली आहे.
या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय सचिव रमेश देसाई, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.