DPT NEWS NETWORK ✍️
प्रतिनिधी: भुवनेश दुसाने
पाचोरा : एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये शिवसेनेतील अनेक मंत्री सहभागी झाले यातील एक मंत्री म्हणजे गुलाबराव पाटील त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टार्गेट केले होते. आणि मंत्री पद सोडून ते एकनाथ शिंदे सोबत आले म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांना गुलाबराव पाटील यांना मंत्री पद द्यावे लागले, तसेच आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटीलाना टार्गेट केलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या मुळेच मला मंत्री पद दिले जात नाही. एकनाथ शिंदे तरी मला मंत्री पद देतील असा गैरसमज चिमणराव पाटील यांना होता आणि ते शिंदे गटात आले. पण त्यांना काय माहित होतं, की गुलाबराव पाटील शिंदे गटात येतील यांचा त्यांना पश्चाताप झाला. पारोळा-एरंडोलचे आ. चिमणराव पाटील यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच ते मतदारसंघात आले. पण येताच त्यांनी गुलाबराव पाटील यांनाच लक्ष केले होते. मतदार संघात परतण्याच्या एक दिवस अगोदारच चिमणराव पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत आता आपण बोलणार नाही मात्र ज्या काही भावना होत्या त्या आपण बोललो असल्याचं चिमणराव पाटील यांनी मान्य केलं होतं.
अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, असताना व पाटील पालकमंत्री असूनही आपल्या मतदार संघातील महत्वाचे प्रकल्प जाणूनबुजून अडवण्यात आल्याचा आरोप चिमणराव पाटील यांनी केलाय. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वात जुने नेते असल्याने मंत्रीपदापासून डावल्याने चिमणराव पाटील हे ठाकरे सरकारवर नाराज होते. शिंदे सरकार आल्याने गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच होती, गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद दिल आहे. आता आ. चिमणराव पाटील यांना मंत्री पद हवंच आहे. तर मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच राज्याचे दिग्गज नेते व जे मुख्यमंत्रीचे दावेदार मानले जात होते . असे आ. एकनाथ खडसे यांचा शिवसेनेच्या माध्यमातून पराभव केला आहे. आणि पहिल्यांदाच आमदार झालो, त्यात बंडखोरी देखील केली. आणि आ. एकनाथ खडसे यांची खूप मोठी ताकद आहे, त्या मुळे मला मंत्री पद द्यावे अशी अपेक्षा आ. चंद्रकांत पाटील यांची दिसतेय. तर पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांनी मतदारसंघात गल्लोगल्ली विकासाचा प्रचंड कायापालट केला आहे. तरी देखील मतदारांनी थोड्याच मतदानानी त्यांना पराभवा पासून बचावले आहे. आता तर २०२४ ची विधानसभा निवडणूकीत त्याची बहीण वैशाली सूर्यवंशी विरोधात असणार व ज्याच्या विरोधात ते काठावर निवडून आले, ते अमोल शिंदे, हे दोन्ही उमेदवार मतदारांन समोर पर्याय म्हणून उभे राहतील या मुळे आ.किशोर पाटील यांना पुढची निवडणूक खुप जड जाणार आहे. हे लक्षात घेऊन आ. पाटील यांना मंत्री पद दिले तर ते निश्चित पणे निवडून येण्याची शक्यता जाणवते. त्यांचे भविष्य लक्षात घेता. त्यानीही मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू केली आहे. मात्र आ. किशोर पाटील यांना मंत्रीपद दिले तर जळगाव जिल्ह्यातल आ. चिमणराव पाटील व आ. चंद्रकांत पाटील हे पुन्हा ठाकरे गटाकडे घरवापशी जातील अशी जिल्यात चर्चा सुरू आहे. या तिन्ही आमदारांची मंत्री पदासाठी जोरदार रसीखेच सुरू असल्याचे पहावयास दिसत आहे.