DPT NEWS NETWORK ✍️
रायगड : कर्जत पोलिस ठाण्याच्या अभिलेखावर असलेला आरोपी गावगुंड गणेश पालकर याने पुर्वग्रह राग मनात ठेवून पत्रकार जयेश जाधव यांच्यावर भ्याड हल्ला केला या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या भ्याड हल्ल्याचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनुसार 2 फ्रेबुवारी २०२२रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता मोठे वेणगाव येथे पत्रकार जयेश जाधव आपल्या लहान मुलासह वृतसंकलनासाठी गेले होते.मात्र काहि महिन्यांपूर्वी त्याच गावातील गावगुंड आरोपी गणेश पालकर यांने स्वतः च्या मोबाईल फोनवरून पत्रकार जयेश जाधव यांना मोबाइलवर काॅल करुन अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे पत्रकार जाधव यांनी कर्जत पोलिस ठाण्यात जाऊन दि 27/11/2022 रोजी रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीचा मनात राग धरून आरोपी गणेश पालकर व त्याचा साथीदार राकेश चौधरी यांनी आपापसांत संगनमताने भाई गायकर यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन दबा धरुन पत्रकार जयेश जाधव यांच्यावर पाळत ठेवून हातवारे करून शिवीगाळ करीत पूर्वग्रह राग मनात ठेवून भ्याड जीवघेणा हल्ला केला.संबधित प्रकाराबाबत जाधव यांनी आरोपी बद्दल कार्यक्रम ठिकाणी भाई गायकर यांना माहिती दिली असता गायकर यांनी त्या ठिकाणी पालकर याला गप्प बसण्याचा सल्ला दिला असताना देखील त्याचे न ऐकता कार्यक्रमाच्या ठिकाणी गालबोट लावण्याच्या दृष्टीने प्रकार केला असून गावात एक प्रकारची दहशत निर्माण केली आहे .या हल्ल्यात जाधव यांच्या लहान मुलाला देखील आरोपी गणेश पालकर यांने जोरदार धक्का देत खाली पाडले पत्रकार जाधव यांना मारहाण करीत असल्याचे पाहून घाबरलेल्या अवस्थेत लहान मुलाने रडत आरडाओरडा केला त्या आवाजाने तेथे स्थानिक लोक धावत आले त्यामुळे तेथे झालेला हा सर्व प्रकार तेथील नागरिकांनी डोळ्यांनी पाहिला त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.या हल्ल्याच्या मारहाणीत पत्रकार जयेश जाधव व त्यांच्या लहान मुलाला गंभीर दुखापत झाली आहे याबाबत पत्रकार जाधव यांनी कर्जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर पत्रकार जाधव यांनी कर्जत पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी गावगुंड गणेश पालकर , राकेश चौधरी रा.मोठे वेणगाव ता कर्जत यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा रजि नं १०६/२०२३ भा.द.वि कलम ३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पोलिस निरीक्षक के. डी .कोल्हे अधिक तपास करीत आहे.
सदर आरोपी गणेश पालकर विरोधात कर्जत पोलिस ठाण्याच्या रेकाॅडवर मारहाण ,शरीराविरूध्द इजा पोहचविणारे दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे त्यामुळे सराईत गुन्हेगार गणेश मधुकर पालकर ह्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे .