DPT NEWS NETWORK ✍️
दहिवेल प्रतिनिधी
राहुल राठोड
दहिवेल येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवभक्त छत्रपति शिवाजी महाराज विचार मंचचे अध्यक्ष प्रणेता देसले यांच्या वतीने दहिवेलचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वळवी व उपसरपंच अमोल सोनवणे यांना निवेदन देण्यात आलेले आहे की वर्षानुवर्षापासुन दहिवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या चौकाला शिवाजी पुतळा चौक किंवा शिवाजी पुतळा असा एकेरी उल्लेख करण्यात येतो म्हणून तात्काळ शिवाजी पुतळा चौकाचे शिवतिर्थ असे नामांतरण करा अशी मागणी प्रणेता देसले यांच्या वतीने दहिवेल ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेली आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विचार मंचचे उपाध्यक्ष विशाल खैरनार देखील उपस्थित होते. त्यास दहिवेलचे उपसरपंच अमोल सोनवणे यांच्या वतीने उत्तम व सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला व लवकरात लवकर शिवाजी पुतळा चौकाला शिवतीर्थ नाव देण्यात येईल असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबावा यासाठी प्रणेता देसले यांच्या वतीने गेल्या एक ते दीड वर्षापासुन महाराष्ट्रभर शिवाजी पुतळा नव्हे शिवतिर्थ म्हणूया हा उल्लेखनीय उपक्रम राबवीण्यात येत आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील आमदार, खासदार, अभिनेते, शेतकरी, व्यवसायईक, युवावर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ मंडळी सहभागी झालेली आहे व भरभरुन प्रतिसाद दिलेला आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी प्रणेता देसलेंच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणेता देसले यांच्या वतीने अनेक दिग्गज मान्यवरांना या उपक्रमात समाविष्ट करुन घेण्यात आलेले आहे. देशभर तसेच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा एकेरी उल्लेख थांबावा यासाठी प्रणेता देसले यांच्या वतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. सदर प्रयत्ना संदर्भात भविष्यात आपण राष्ट्रपती महोदय तसेच राज्यापाल महोदय यांच्याकडे देखील या बाबत विनंती करणार आहोत. असे प्रणेता देसले यांनी स्पष्ट केलेले आहे. देशाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहेत ते आज देखील संपुर्ण जगाला प्रेरणा देतात तसेच युवा पिढीला देखील प्रेरणा देऊन जातात त्याच छत्रपती शिवाजी महाजारांच्या पुतळ्यांचा एकेरी उल्लेख होणे ही अतिशय दुर्भाग्यपुर्ण बाब आहे. त्यामुळे आपण सदर उपक्रम हाती घेऊन देशभर तसेच महाराष्ट्रभर या पुढील काळात देखील जनजागृती करणार आहोत असे प्रणेता देसले यांनी सांगीतलेले आहे.