DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन शासन स्तरावर शर्थीचे प्रयत्न करण्यात येतील व तसेच साक्री तालुक्याशी तांबे परिवाराचे जुळलेले नातं अधिक दृढ होण्याकरिता पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटीबद्ध राहीन अशी ग्वाही नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. सत्यजित सुधीर तांबे यांनी दिली. साक्री येथील न्यु इंग्लिश स्कुल मधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात त्यांचा नागरी सत्कार संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे, माजी खासदार बापूसाहेब चौरे, साक्री नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, दिपक भारुडे, विजय गांगुर्डे, बांधकाम सभापती, अँड. गजेंद्र भोसले, संचालक दिपक अहिरराव, संजय पाटील, यु.एल.बोरसे, नगरसेवक दिपक वाघ,जगदीश वाघ,पंचायत समितीचे माजी सभापती गणपत चौरे, माजी पं.स. सभापती प्रदीप सोनवणे, सचिन सोनवणे उपस्थित होते. यावेळी हर्षवधन दहिते युवा मंच च्या वतीने आ. डॉ. तांबे यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच तालुक्यातील विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी देखील सत्कार केला. यावेळी महीर चे सरपंच रमेश सरक, भाजपा चे माजी तालुकाध्यक्ष विजय भोसले, भाजप चे तालुका सरचिटणीस प्रदीप नांद्रे, म्हसदी चे माजी सरपंच कुंदन देवरे, साक्री तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था चे चेअरमन अनिल शिंदे, सामोडे विकासो चे चेअरमन रमेश महंत, सामोडे चे उपसरपंच सचिन शिंदे, माजी उपसरपंच मुकुंद घरटे, माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब घरटे, मुन्ना देवरे, नितीन अहिरराव, हर्षल बिरारीस, सागर काकुस्ते, अतुल दहिते, बिपीनचंद्र सोनवणे, विजय पाटील,प्रसाद देसले आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपा युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रा. संजय बच्छाव व सर्व शिक्षक वृंद ने परिश्रम घेतले.