नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

उरण पोलीस ठाणे आयोजीत हळदी कुंकू समारंभ संपन्न

DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – दिप्ती पाटील

उरण :–१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस आणि अश्या गोड दिवशी उरण पोलीस स्टेशन यांनी आपल्या उरण तालुक्यातील सर्व महीला भगिनी साठी सौभाग्याचे लेने म्हणजे हळदीकुंकू आणि या हळदीकुंकू समारंभाचे नियोजन बद्द कार्यक्रमाचे आयोजन दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. भावनताई घाणेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश) यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास गोड अशी सुरवात केली.
उरण महिला पोलीस पी. एस .आय.गायकवाड अंजना, पोउपनि पदमजा पाटील, मपोहवा १९० रचना ठाकूर, मपोहवा १३९३ प्रदेवी पाटील, मपोना २५८१ प्रिती म्हात्रे, मपोशी प्रियंका पाटील, मपोशी ३६६० सुरेखा राठोड, मपोशी ३७४९ वैशाली पाटील यांनी सर्व महीला भगिनी यांना हळदीकुंकू वहाण देऊन पुजन केले. मान्यवर महिला भगिनीचे महिला संक्षमिकरण विषयी भाषणे झाली. त्या वेळी आज उरण पोलीस ठाणे हद्दीत एका लहान पाच वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला.त्यामुळे संपूर्ण दिवसभर भावना ताई त्या लहानग्या चिमुकलीला घेऊन उरण पोलीस स्टेशन मध्ये न्यायासाठी त्या जातीने हजर राहून त्या नराधमाने केलेल्या दुशकुत्याची सजा उरण वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा. सुनील पाटील साहेबांन कडे तक्रार करुन त्या नराधमाला जेर बंद करुनच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवीण्या साठी उपस्थित राहील्या .उरण पोलीस स्टेशन आयोजित हळदीकुंकू हा महिलांन साठी दरवर्षी आनंददायी, स्मरनिय पर्वणीच असतो.
तदनंतर संगीत खुर्ची गेम, ष्ट्रा गेम,बलुन गेम, नाचगाणी असा रंगतदार कार्यक्रमात गायक देवेंद्र पाटील, वृषाली पाटील यांनी गायण केले. छान प्रिती भोजन होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित मा. सुनील पाटील(वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण), सौ भावना ताई घाणेकर(राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश), सौ. सायली म्हात्रे(मा.नगराध्यक्षा उरण), सौ सीमा घरत(शेकाप तालुका अध्यक्षा)विमल पाटील, नायदा ठाकुर, आफशा मुकरी , कुसुम ठाकूर, लीना पाटील, वर्षा म्हात्रे, दिपाली पाटील, लता पाटील, रुपाली खाडे, अरुणा घरत रेणुका पाटील, वंदना कोळी, उरण पोलीस स्टाफ सर्व महिला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:25 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!