DPT NEWS NETWORK 🗞️✍️
शिरपूर: रविवारी संध्याकाळी नेहमी प्रमाणे यशवंत निकवाडे व त्यांच्या धर्मपत्नी फिरावयास निघाले. परत येतांना करवंद नाक्यावर एक चामडी बॉक्स मध्ये काहीतरी पडलेले दिसले. त्यांनी ते उचलले आणी घरी परतले. त्याच्यात एक महागडा 25000 चा मोबाईल होता. तो बोराडी फार्म सी महाविद्यालयाचा प्राध्यापकाचा होता त्यांनी तो नवीनच घेतला होता .त्या मोबाईलवरून call आला. निकवाडे सरांनी तो उचलून त्या व्यक्तीशी संवाद साधला. निकवाडे म्हणाले तुमच्या मोबाईल सुरक्षित आहे. त्यांना निकवाडेंनी घराचा पत्ता व मोबाईल नंबर दिला. त्यांना निकवाडेंनी घरी बोलावले. ते निकवाडेंचा घराचा पत्ता शोधत घरी आले. ते मोबाईल हरवल्या मुळे बेचैन झाले होते. निकवाडेंनी त्यांना पाणी दिले. चहा दिला व त्यांच्या मोबाईल सन्मानाने परत केला. त्यांच्या मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांना खूप भरूनआले. कोणत्या शब्दात आभार मानावे हे त्यांना समजत नव्हते. त्यांचे मन भरून आले. जातांना ते म्हणाले, आपल्या सारखे लोक या कलियुगात भेटण खरच दुर्मीळ आहे. डोळ्यात आनंद अश्रु गाळत ते आनंदाने परत गेले.या घटनेमुळे माणुसकी अजून जिवंत आहे हे समजते.