DPT NEWS NETWORK 🗞️✍️
शिरपूर: श्री.यशवंत निकवाडे हे वर्शी आदिवासी आश्रम शाळेत सहशिक्षक म्हणून गेल्या 28 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचे मुळ गाव वर्षी असून ते तेथेच लहानाचे मोठे झाले. लहानपणापासून त्यांना अनेक गोष्टींची आवड होती. चित्र काढणे त्यांना लहानपणापासूनच आवडायचे. पण कोरोणा काळात त्यांनी अनेक चित्र काढली त्यांना खूप प्रसिद्धीपण मिळाली याच संकल्पनेतून त्यांनी समाज प्रबोधन करणारे चित्रे काढली. त्यांचे संकलन करून त्यांनी “चित्रातील भावविश्व ” हे पुस्तक प्रकाशित केले .त्यांना ह्या कामात प्रा.डाॅ.रामोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री.यशवंत निकवाडे यांचे आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाली असून ते इंग्रजी विषयाचे नामवंत शिक्षक आहेत त्यांचे आतापर्यंत अनेक ठिकाणी व्याख्यानेपण झालेली आहेत .त्यांचे सुत्र संचालन ऐकणे हि श्रोत्यांसाठी एक पर्वणीच असते.ते सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच पुढे असतात. अशा बहुगूणी शिक्षकाचे” चित्रातील भावविश्व” हे पुस्तक समाज प्रबोधन करणारे असून ह्या पुस्तकाचा प्रकाशनावेळी प्रा डाॅ. लुंगसे मॅडम, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ पटू श्री विनायक वाडीले.श्री.एस ए.भोई सर.श्री.गणेश मोरे,श्री.सी.एम.भोई, श्री.विकास खेडकर, श्री भाईदास भोई, श्री.तुषार साटोटे, महारू भाऊ, श्री अजिंक्य भिसे ई.मान्यवर उपस्थित होते.