DPT NEWS NETWORK 🗞️✍️
लोणखेडा: समस्त दाहिगाव गुरव समाजाची आढावा बैठक लोणखेडा येथील अमेय क्लासेसच्या इमारतीत गुरव समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक मधुकर ओंकार गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समस्त दाहिगाव गुरव समाजाचे अध्यक्ष सुधाकर गुरव व ज्येष्ठ सल्लागार एन टी गुरव व्यासपीठावर उपस्थित होते.
समस्त दाहिगाव गुरव समाजाच्या आगामी काळात होत असलेल्या वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोणखेडा येथे समस्त दाहिगाव गुरव समाजाचे सचिव संजय गुरव यांनी बैठक आयोजित केली होती यावेळी प्रकाशा येथे होत असलेल्या समाज भवनाच्या बांधकाम विषयी चर्चा करून बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी संकलना विषयी चर्चा करण्यात आली तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ नियोजना विषयी चर्चा करताना राधेश्याम शंकर गुरव, भुषण यदुनाथ गुरव यांनी इयत्ता १ ते ९ प्रथम येणाऱ्या विद्यार्थांसाठी स्कूल बॅग तसेच द्वितीय विद्यार्थांसाठी अध्यक्ष सुधाकर गुरव यांनी कंपास पेटी व पॅड तसेच तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थांसाठी शहादा येथील विशाल गुरव यांच्या कडून शालेय उपयोगी साहित्य देण्याचे जाहीर केले.तसेच इयत्ता १० वी ते पदवी व पदवीत्तर विद्यार्थांसाठी शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्याचे ठरविण्यात आले.यासाठी प्रमाणपत्र छपाई चे काम समस्त दाहिगाव गुरव समाजाचे उपाध्यक्ष संतोष गुरव यांच्या मार्फत करुन देण्यात येणार आहे तसेच इयत्ता 9 वी मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थीस 501/- रु. व ई. 10 वी हिंदी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 501/- रु. असे पारितोषिक राजेंद्र गुरव पाडळदा यांच्या कडून जाहीर करण्यात आले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली यावेळी उपाध्यक्ष संतोष गुरव, कोषाध्यक्ष पावभा गुरव,सह-सचिव दिपक गुरव संपर्क प्रमुख रविंद्र गुरव तसेच शिक्षण समिती अध्यक्ष रविंद्र गुरव,उपाध्यक्ष राकेश गुरव, बांधकाम समिती अध्यक्ष शशिकांत गुरव,मुकेश गुरव,निखिल गुरव आदि उपस्थित होते यावेळी शिवजयंती चे औचित्य साधत श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन व द्विपप्रज्वल करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुरव यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर गुरव यांनी मानलेत.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.