DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : संजय गुरव
नंदुरबार: पंढरपुरचे विठ्ठल रुख्माई मंदीराचे मुख्य पुजारी सुनिल गुरव यांनी गुरव समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना कर्म कांड यावा म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात प्रचार प्रसार करत आहेत.त्यासाठी त्यांनी पंधरा दिवस कार्यशाळा सुरु करण्याचे नियोजन केले आहे.गुरव समाज हा पुजारी असुन येणाऱ्या भावी पिढीला आध्यात्मिक ज्ञान मिळावे या हेतुन ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात भ्रमण करुन विद्यार्थीना कार्यशाळेत जुडण्यासाठी प्रचार प्रसार करत आहेत.
दि.20 फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथील गुरव समाजाचे जेष्ठ सेवक ऐन.टी.गुरव.यांचा निवासस्थानी सदर विषयावर भेट दिली व कार्यशाळेत नंदुरबार विभागातील गुरव समाजातील विद्यार्थीनी जुडावे असे आवाहन केले.या सुखद प्रसंगा निमित्ताने सुनिल गुरव यांचा सन्मान करण्यात आला.सदर झालेल्या सभेत गुरव समाज उन्नती संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुरव,दाहीगावचे अध्यक्ष सुधाकर गुरव,नंदुरबारचे अध्यक्ष प्रविन गुरव सचिव सुधीर गुरव कोषाध्यक्ष नरेश गुरव,दाहिगावचे माजी अध्यक्ष जगन्नाथ गुरव,माजी सचिव शशिकांत गुरव,बापु गुरव आदी समाज बांधव उपस्थित होते.