नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वाडी-शेवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पाटली नदी पर्यन्त व्हावे,जि.प.सदस्य विरेंद्रसिंग गिरासेसह शेतकर्यांचे धुळे मध्यम प्रल्पाकडे निवेदन

DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी: श्रीकृष्ण पाटील

वडणे(प्रतिनिधी):शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पाटली नदी पर्यन्त व्हावे. अशी मागणी दि.१ रोजी धुळे मध्यम प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता पी.जी.पाटील यांना आमदार तथा माजी मंञी जयकुमार रावल यांच्या पञाव्दारे जि.प.सदस्य विंरेद्रसिंग गिरासेसह शेतकर्यांनी नुकतेच निवेदन देवुन मागणी करण्या आली.
माजी मंञी तथा आमदार जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांनी चिमठावळ, रोहाणे येथील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांना सोबत घेऊन वाडी- शेवाडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पाटली नदीपर्यंत पूर्ण व्हावे यासाठी आमदार जयकुमार रावल यांचे पत्र( निवेदन) घेऊन धुळे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. पी. जी. पाटील यांना देण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंती पी.जी.पाटील पाटील यांनी आश्वासन दिले की, लवकरात लवकर उजव्या कालव्याचे काम पूर्ण करून, पाटली नदीपर्यंत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासित करून शेतकऱ्यांचे समाधान केले. तसेच लवकरच याबाबतीत सवाई मुकटी येथे शेतकऱ्यांची मीटिंग घेण्यात येईल. यावेळी रोहाणे येथील सरपंच मेघराज वाघ, चिमठावळ येथील माजी सरपंच वगरसिंग गिरासे, रोहाने येथील माजी उपसरपंच आनंदा जयराम पवार, चिमठावळ येथील ज्येष्ठ शेतकरी साहेबराव मराठे, संजय पाटील, राजेंद्र पाटील, खुशाल पाटील, राजेंद्र मराठे, एकनाथ पाटील, सोनू पाटील, रोहाणे येथील योगेश वाघ, हेमंत वाघ, नगराज वाघ, शहीद पिंजारी, निलेश पाटील, दीपक वाघ, हिरामण वाघ, निंबा विश्राम वाघ, अधिकार वाघ, योगेश युवराज वाघ, असे निवेदन देताना उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!