DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : संदिप अहिरे
धुळे – धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडी / सेलची नूकतीच राष्ट्रवादी भवन, धुळे येथे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री.ईश्वरजी बाळबुधे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक ओबीसी प्रदेशअध्यक्ष श्री.ईश्वरजी बाळबुधे यांनी घेतली. यावेळेस त्यांच्या सोबत उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्री.उमेश नेमाळे, श्री.बापूसाहेब महाजन, श्री.राजेशजी बागूल, शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले आदी उपस्थित होते. सदर आढावा बैठकीमध्ये प्रदेशअध्यक्ष श्री.ईश्वर बाळबुधे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ओळख करुन घेतली. व संघटनात्मक कामकाज कसे चालू आहे. यासंदर्भात आढावा घेतला. तसेच जास्तीत जास्त ओबीसी जातीतील तरुणांना पक्ष संघटनेत सहभागी करुन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी उभे करावे असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी संघटन हे वाढले पाहिजे. कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पक्षाचे व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवले पाहिजे. असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी शहराध्यक्ष श्री.राजेंद्र चौधरी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.अमिन शेख यांनी केले.
सदर कार्यक्रमाला जितू पाटील, महेंद्र शिरसाठ, रईस काझी, राजेंद्र सोलंकी, संजय माळी, अमित शेख, उमेश महाले, आण्णासाहेब सुर्यवंशी, राजेंद्र चितोडकर, सागर चौगुले, चेतन पाटील, स्वामिनी पारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.