DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. प्रतिनिधी: संदीप अहिरे
धुळे : इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि, नवी दिल्ली चे संचालक श्री. प्रदिप कटीयार यांच्या सांगण्यावरुन सदर कंपनीचे अकांउन्टींग व फायनन्स अधिकारी हरिश सत्यवली यांनी तक्रारदार यांचेकडे स्वताः करिता व प्रदिप कटीयार, संचालक यांचेकरिता एकुण ७,००,०००/- रु. ची पंचा समक्ष लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि. नवी दिल्ली या कंपनीने नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडीया यांचे कडुन दि.२८.०९.२००५ रोजी बांधा, चालवा व हस्तांतरीत करा या तत्वावर करारनामा केला आहे. सदर कंपनीने कोरल असोसिएटस (उदयपुर, राजस्थान) या कंपनीस दि. २२.०८.२०२२ रोजी नॅशनल हायवे क. ३ (मुंबई-आग्रा) यावर असलेला चांदवड जि.नाशिक येथील टोल प्लाझा चे संपुर्ण व्यवस्थापन करण्याचा करारनामा केला आहे. सदर कंपनीने तकारदार यांना दि.२५.०८.२०२२ रोजी मुखत्यार पत्राव्दारे टोल प्लाझा, चांदवड, जि. नाशिक चे संपुर्ण व्यवस्थापन व त्या सबंधी कागदोपत्राचे अधिकार प्रदान केले आहेत. तकारदार यांनी कोअर असोसिएटस कंपनीने चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापना बददलचे डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ चे रिअम्बर्समेंन्ट रक्कम अदा करण्यासाठी व कोरल असोसिएटसने धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजुर करण्यासाठी तकारदार यांचेकडे दि.१९.०२.२०२३ रोजी धुळे लळिंग इरकॉन सोमा टोल वे चे मुख्य कार्यालयात फायनन्स अधिकारी श्री. हरिष सत्यवली यांनी स्वत:हा साठी २,००,०००/ रु व इरकॉन सोमा टोल व प्राय.लि. नई दिल्ली चे संचालक श्री. प्रदिप कटीयार यांचेसाठी ५,००,०००/- रु ची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी आज दि.२१.०२.२०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दिली होती. तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि. नवी दिल्ली या कंपनीचे संचालक प्रदिप कटीयार यांनी मोबाईल व्दारे सांगितले वरुन सदर कंपनीचे फायन्नास अधिकारी हरिष सत्यवली यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वताः करिता २,००,०००/- रु व संचालक प्रदिप कटीयार यांच्याकरिता ५,००,०००/- रु असे एकुण ७,००,०००/- रु. ची पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांनी इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि. कंपनीच्या धुळे लळिंग टोल प्लाझा जवळील मुख्य कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द पोस्टे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक श्री. मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, भुषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, रोहीणी पवार, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, मकरंद पाटील यांनी केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस उप अधीक्षक मा. श्री नरेन्द्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.