DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: गौतम जगताप
कुकाणे येथिल १९फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य निबंध स्पर्धा,शिव व्याख्यान तसेच नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उपस्थित सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्रावण महाराज अहिरे, आत्माराम अहिरे(शि.विस्तार अधिकारी), प्रशांत मगर (जि.प.लेखा अधिकारी) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती. तसेच
शिवजन्मोत्सव सोहळा शिवविचारातून रूजवण्यासाठी युवा वक्ते योगेश कळमकर आणि किशन सोनवणे यांनी महापुरुषांच्या विचाराना उजाळा देत. आपल्या वाणीतून बाणेदार शैलीत छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक शौर्यगाथेचे महत्त्व विशद केले. महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचवण्यापेक्षा, महापुरुषांना डोक्यात रूजवण्याची आजच्या स्थितीला गरज आहे. या संकल्पनेतून कुकाणे शिवजन्मोत्सव समितीने शिव विचारांचे बीज पेरून भव्य दिव्य असा कार्यक्रम साकार केला.व आजच्या तरूणाईच्या वैचारिक सुप्त गुणांना पारखण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.एकुण १२० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यात चार गट विभागून प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांकाने १ली ते ४थीच्या गटात प्रथम कु.चैतन्य भामरे,द्वितीय कु.सारीका खैरनार, तृतीय कु.परिनीती गवळी ,५वी ते ८वीच्या गटात प्रथम कु.माधुरी अहिरे,द्वितीय कु.गितांजली अहिरे, तृतीय कु.खुशी सुर्यवंशी, ९वी ते १२ वीच्या गटात प्रथम कु.मयुरी शेवाळे,द्वितीय कु.हर्षदा पवार,तृतीय कु.मिताली निकम,खुला गटात प्रथम श्री संजीव काळे सर द्वितीय कु.गौतम जगताप, तृतीय कु.आसावरी ह्याळीज असे एकूण १२ स्पर्धक विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून केदाबाई रौंदळ,श्रावण लोंढे, आत्माराम अहिरे तसेच नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. डि.आर.राॅकर्स ग्रुपने शंकरा रे शंकरा या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ग्रुप डान्सर रवि बोरसे यांना देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल दादा ह्याळीज आणि अचल लोंढे यांनी केले. शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी कुकाणे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष सहकार्य शिवजन्मोत्सव समिती,कुकाणे ग्रा.पं सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि.का.सोसायटी चे.व्हा.चे.सर्व सदस्य, रेणुका देवी शिक्षण प्रसारक मंडळ,सा.फु.मा.विद्यालय कुकाणे,जि.प.प्राथमिक शाळा कुकाणे, युगांतर सामाजिक प्रतिष्ठान व युवा मित्रपरिवार मंडळ कुकाणे तसेच माता, भगिनी यांचे विशेष सहकार्य लाभले.
लेखन
गौतम केदारनाथ जगताप
कुकाणे ता.मालेगाव जि.नाशिक
मो:- 9356589514