DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : गौतम जगताप
कुकाणे- कांदा लागवडीतून आर्थिक स्थिती सुधारेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात कांदा लागवड केली होती. परंतु कांद्याला हि चांगला भाव मिळाला नाही म्हणून आधीच बळीराज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मग त्याच परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी कांद्याला पूरक म्हणून कुकाणे गावातील युवा शेतकरी विशाल ह्याळीज यांनी कांदा पिकाची नुकसान भरपाई काढून घेण्यासाठी गेल्या 1 फेब्रुवारीला कोशिंबीरची लागवड केली होती. त्यांनी एकूण 20 गुंठे क्षेत्रात एकूण 20 किलो बियाणे टाकले होते. त्यांना त्या कोशिंबीर काढणीला येई पर्यंत एकूण 6300 एवढा खर्च आला होता. एवढ्या खर्चाच्या मोबदल्यात त्यांना अधिक नफ्याची अपेक्षा होती परंतु जेव्हा कोशिंबीर काढणीला आली तेव्हा मार्केट रेट हे खूपच ढासाळले होते. अवघी 400 ग्रॅम च्या गड्डीची फक्त 1.5रू ते 2 रु. प्रयन्त मार्केट ला मागणी होती. अशा परिस्थितीत त्यांना ती कोशिंबीर मार्केट प्रयन्त पोहचवणे सुद्धा न-परवडणारे झाले.आणि ज्या अपेक्षेने त्यांनी कोशिंबीर टाकली होती. त्यांचा खर्च सुद्धा वसूल न झाल्याने कोशिंबीर वर त्यांनी शेवटी रोटर फिरवले.
अशी बिकट वेळ शेतकऱ्यांना,जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण करते.
आशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासन व्यवस्थेने बारकाईने लक्ष देवून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल द्यावेत.
सरकार तुमच्या अनुदानाची अपेक्षा नाही आम्हाला, फक्त आणि फक्त आमच्या कष्टाचं सोनं करा… योग्य हमीभाव द्या बस एवढीच माफक अपेक्षा ठेवतो.