DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी : आरीफ भाई शेख
पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती नामदार निलमताई गोऱ्हे यांना मातृ शोक झाला असून निलमताई
यांच्या मातोश्री कै. लतिका दिवाकर गोऱ्हे यांचे दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झाले.
व आज बुधवार, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता आळंदी देवाची इंद्रायणी नदी वर, विधान परिषदेच्या उपसभापती नामदार निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या मातोश्रीचे विधीवत अस्ती विसर्जन केले, यावेळी आईच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचे दिसुन येतहोते. आपली आई आपल्यात नाही हे दुःख चेहऱ्यावर जाणवत असतानाच त्यातून लगेच सावरत त्या सामाजिक जबाबदारी पार पाडली जाणे हे आपले कर्तव्य आहे याची जाण धरत त्या पुन्हा सावरल्या आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेल्या आपल्या हितचिंतक यांची विचारपूस करत होत्या. माजी जिल्हा प्रमुख डॉ, रामगावडे यांचे कडे कार्यकर्त्यांची अस्थेवायिक पने चौकशी केली, अस्थी विसर्जन करण्या साठी डॉ. गोऱ्हे आणि त्यांच्या भगिनी जेहलम जोशी आणि अन्य सदस्य शिवसेना नेते मा. जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, आळंदी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास केंद्रे, शहर संघटक आनंदराव मुंगसे,संदीप भाऊ पगडे , उपशहर प्रमुख शशिकांत राजे,रामहरी गंनगे,शहर संपर्कप्रमुख बालाजी शिंदे,सुनील थोरवे शिवसेना, महिला आघाडी विभाग प्रमुख संगीता ताई फपाळ, शहर प्रमुख मंगलताई हुंडारे,पोलीस प्रशासन उपस्थित होते.