DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : मनोहर गोरगल्ले
खेड : खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील SEZ मध्ये ठेकेदारी मिळावी म्हणून स्थानिक भूमीपुत्रांमध्ये मारामारी करण्यात आली आहे. या आधी सुध्दा अशा प्रकारे घटना घडल्या आहेत. खेड SEZ हद्दीतील निमगाव खंडोबा हद्दीतील सी.सी.टी.ई.बी.कंपनीतील ठेकेदारी वरुन गावातील तरुण मुलांमध्ये मारामारी झाली असून पवन नंदाराम सुर्वे जखमी झाला आहे.व अमर काताराम शिंदे,सनी शिंदे, हर्षद राक्षे, हर्षवर्धन शिंदे,अण्णा शिंदे या पाच आरोपीं विरोधात खेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.या गुन्ह्याची तक्रार समाधान कोठावळे यांनी दिली आहे.या आधी जवळच असलेल्या कन्हेरसर येथील एमआयडीसी मध्ये ठेकेदारी मिळावी म्हणून एकाचा खून करण्यात आला आहे. SEZ कंपनी मध्ये गावातील मुलांना नोकरी व ठेकेदारी मिळावी यासाठी निमगाव खंडोबा ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले व त्याप्रमाने ठराव करण्यात आले. तसे पत्र संबंधित कंपनींना व एमआयडीसीला देण्यात आले आहे. परंतु स्थानिकांमध्ये जर मलाच ठेकेदारी मिळावी म्हणून अशी घटना घडत राहीली तर संबंधित कंपन्या गावातील मुलांना नोकरी किंवा ठेकेदारी देतील का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट साहेब, करीत आहे.