DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: संदिप अहिरे
धुळे : धुळे शहरातील गफूर नगर भागात झालेल्या घरफोडीचा 24 तासाच्या आत तपास लावण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाई मुळे त्यांची सर्वत्र कौतुक होत आहे. धुळे शहरातील वडजाई रोड गफूर नगर भागात राहणाऱ्या मकसूद अली सय्यद अली हे आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असताना खालील मजल्याच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत 44 हजार रुपयाची रोकड व 15 हजार रुपयांचे किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले होते. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी वेगाने आपल्या तपासाची चक्र फिरवत दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वसीम जैनुद्दीन शेख व आबिद हुसेन अन्सारी अशी दोघा चोरट्यांची नावे असून ते धुळे शहरातील वडजाई रोड भागात राहणारे आहेत दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिली. दोघांकडून चोरलेल्या मुद्देमाल रोकड पैकी 21 हजार 700 रुपये व 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, दोघांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पथकाने केलेल्या या कामगिरीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखल घेत कौतुक केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि विभगी पोलिस उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पंकज चव्हाण, संदिप पाटील, बी. आय. पाटील, चेतन झोळेकर, स्वप्नील सोनवणे, इंद्रजित वैराट, शरद जाधव यांनी ही कारवाई केली आहे.