DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: नंदकुमार मेश्राम
चंद्रपूर : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि देशातील सर्वात लोकप्रिय शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर हुकूमशाही सरकारचा चंद्रपुरातील गांधी चौकात आम आदमी पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या नेतृत्वात निषेध कार्यक्रम घेत केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी सुनील मुसळे यांनी सांगितले की, अनैतिक मार्गाने राजकीय विरोधकांना जमेल त्या मार्गाने त्यांचे खच्चीकरण करणे तसेच त्यांचा खरा आवाज दाबण्यासाठी सरकारचे अधिनस्त असलेल्या यंत्रणांचा वापर करीत आहे. ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे. गेल्या अनेक दिवसापासून सीबीआय मार्फत दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दिल्ली सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या राज्य उत्पादन विभागाचे एका निर्णयाचे कारण पुढे करून त्याबाबत कारवाईचा बडगा दाखवून तसेच चौकशीचा ससेमीरा त्यांचे मागे लावून अनैतिक पद्धतीने अटक केली. केंद्रात बसलेल्या सरकारला सुबुद्धी येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
यावेळी सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष, भिवराज सोनी, प्रा. नागेश्वर गंडलेवार | जिल्हा संघठक, संतोष दोरखंडे | जिल्हा सचिव, रविकुमार पुप्पलवार | बल्लारपुर शहराध्यक्ष, ज्योतिताई बाबरे | बल्लारपुर सचिव, सागर कांबळे | यूथ अध्यक्ष, बल्लारपुर, ऍड. सुनीता पाटील | महिला शहराध्यक्ष, चंद्रपूर, राजू कुळे | शहर सचिव, चंद्रपुर, अमित बोरकर | शहर सचिव, घुगुस, संतोष बोप्पचे | शहर यूथ सचिव, चंद्रपूर, मीना सरकटे, सिकंदर सागोरे, सलमा सिद्दीकी, बेबी बुरड़कर, विकास खाड़े, सुजाता बोधुले, राणी जैन, शबनम शेख, रूपा काटकर, जास्मिन शेख, सुहाष रामटेके, सुनील भोयर, पुष्पा बुधवारे, सुहानी दुर्योधन, ज्योती तोडासे, संगीता चहांदे, पर्वतां विचोडे, योगेश गोखरे, भास्कर वाकळे, सुनील सतबईया, सोनल पाटील | तालुका अध्यक्ष, भद्रावती, मंगला मुक्के, मधुकर साखरकर, निलेश रामटेके, सागर बोबडे चंदू माडुरवार ,सुजित चेडगुलवार तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.