DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : मनोहर गोरगल्ले
सिसोदिया यांच्यावरील आरोप धादांत खोटे :आप
दिल्लीतील शिक्षण मंत्री सिसोदिया यांना झालेली अटक ही संविधान विरोधी आणि राजकीय द्वेषापोटी करण्यात आली आहे असे सांगत आज आम आदमी पार्टी चा त्यांच्या वतीने चाकण बस स्टॅन्ड चौथा जवळ निषेध आंदोलन करण्यात आले.
आम आदमीचा उगमचा आंदोलनामधून झालेला आहे आणि अशा पद्धतीच्या दडपशाहीला अटकसत्राला आम्ही घाबरत नाही. एका सिसोदिया ना अटक कराल तर असे हजारो सिसोदिया इथे तयार होतील. मनीष सिसोदिया यांच्या अटक विरोधात आज आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असे या वेळी आपचे तालुका अध्यक्ष शाह आलम बेग यांनी सांगितले.
ही एक प्रकारे अघोषित आणीबाणीच आहे ‘ असा आरोप आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष संदीप शिंदे यांनी यावेळेस केला.
एकीकडे जनतेचा लाखो करोडो पैसा उधळणारे अदानी सारखे लोक यांना सोडून लाखो मुलांना शिक्षणाची नवीन व्यवस्था पुरवणारे ,जगभर गौरवले जाणारे दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलचे प्रणेते सिसोदिया यांना अटक करणे हे भाजपच्या मनातील आम आदमी पार्टीच्या विषयी भीतीचे लक्षण आहे. दिल्ली पंजाब त्यानंतर गुजरात मधील आणि दिल्ली महानगर पालिकेतील यशामुळे भाजपला आम आदमी पार्टीची भीती वाटू लागलेली आहे. त्यामुळेच ही दमन नीती वापरण्याचे भाजपने ठरवलेले दिसते आहे. याविरुद्ध आम आदमी पार्टी रस्त्यावरती संघर्ष करेल, असे आप चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी म्हटले.
या आंदोलनाच्या वेळेस मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळेस आप चे जिल्हा संघटन सचिव अक्षय शिंदे , शेतकरी संघटना राजय सहसंघटक संदीप पाटील, पुणे जिल्हा सामाजिक न्यायचे अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी संघटक मनोहर पाटील, साहिल जवळेकर , पंढरीनाथ जरे, विशाल दुर्गाडे निर्मल साबळे, संजय गायकवाड साजिद मुलानी , नितीन सैद, सखाराम भोकरे आदी उपस्थित होते.