DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील घोड्यामाळ परिसरात वडारवाडी येथे राहणाऱ्या पंधरा वर्षे तरुणी राजेश्री मंजुळकर या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पिंपळनेर येथे घोड्यामाळ परिसरात वडारवाडी येथे येथे ही वस्ती आहे या ठिकाणी राहणाऱ्या रेणूबाई रामदास मंजुळकर या महिलेने पिंपळनेर परिसरात फिर्याद दिली असता यात नमूद करण्यात आले आहे की ही सदर महिला आपल्या मुलीसह या वस्तीत राहत होती उदरनिर्वाहासाठी ही महिला बाहेरी कामाला गेली असता यात तिची अल्पवयीन मुलगी राजश्री मंजुळकर हिच्या वर याच परिसरात राहणाऱ्या राज दीपक सिकलकर याचा प्रेम संबंधातून या तरुणाने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिची आई घरी नसल्याचा फायदा घेत वारंवार तिच्यावर अनैतिक कृत्य व अत्याचार केले दोन्ही समाजातील बदनामी होईल या भीतीने राज शिकलकर पिंपळनेर यांनी तिचा गर्भपात करण्याचे ठरवले त्यासाठी तिला रिक्षाने धुळ्याला आणण्यात आले एका खाजगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत पुन्हा पिंपळनेर आत आणून घरात एकटी सोडून देण्यात आले ही बाब निदर्शनास आल्यानंतर जवळ असलेल्या कासूरकर यांनी व इतर नागरिकांच्या सहाय्याने एका खाजगी वाहनाने त्या मुलीला पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात येथे आणले या ठिकाणी राजश्री मंजुळकर या पीडित तरुणीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाले आहेत यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे मृत तरूणीचे वय अवघे पंधरा वर्षे सहा महिने वीस दिवस आहे.
तिचा संशयस्पद मृत्यू झाल्याने प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने तिच्यावर धुळ्यात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले रात्री उशिरा तिच्या मृतदेहात पिंपळनेरात आणून तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला ,या घटनेचा संशयित आरोपी राज सिकलकर यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न.65/2023 भा.द.वि.376(1)(N) सहलैंगिक अधिकारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम आहे पुढील तपास पोलीस उपअधीक्षक पिंपळनेर पी.पी.सोनवणे हे करीत आहे.