DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी = संजय गुरव
शहादा : मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता त्याचे वाईट वाटून भावा भावात जबर हाणामारी होऊन गंभीर दुखापत केल्याची घटना परिसरातील लोंढरे येथे घडली असून याबाबत सावळ्या नथ्थू सूर्यवंशी यांनी याबाबत शहादा पोलीस स्टेशन ला भाऊ ,पुतण्या ,व वाहिनी यांच्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सावळ्या नथ्थू सूर्यवंशी वय ६५ राहणार लोन्ढ्रे ता.शहादा,जि.नंदुरबार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की ते दि १२ मार्च,२०२३ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात साठवलेला कापूस विक्रीसाठी गाडीत भरत असतांना त्यांच्या भाऊ उत्तम नथ्थू सूर्यवंशी ,शालिक नथ्थू सूर्यवंशी ,पुतण्या राजेश शालिक सूर्यवंशी ,वाहिनी सुमनबाई उत्तम सूर्यवंशी हे त्यांचा घरा समोरील अंगणात येऊन शिवीगाळ करू लागले व जोरात आरडा ओरड करू लागले तेव्हा त्यांना शिवीगाळ का करतात या बाबत जाब विचारला असता त्यांना त्याचा राग येऊन त्यांच्या हातातील लाकडी काठीने नथ्थु सुर्यवंशीच्या डोक्यावर कपाळावर ,गालावर ,छातीवर ,लाकडी काठीने मारले त्यात नथ्थु सुर्यवंशीला कपाळावर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव निघू लागले तसेच त्याचा शरीरावर इतर ठिकाणी मुका मार लागला लागला आहे .तसेच वरील आरोपींनी त्याला लाथा बुक्य्यानी जबर मारहाण केली व त्याला जीवेठार मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले .त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या पत्नीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेले असता त्याला कपाळावर दुखापत झाल्याने तीन ते चार टाके पडले आहेत .त्यानंतर त्याने दि १३ रोजी शहादा पो स्टे येथे फिर्याद देण्यासाठी गेलेत.
याबाबत आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.गु र नं ०११६/२०२३ भा द वि कलम ३२४,३२५,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून हवलदार अशोक कोळी,जितेन्द्र इशी,मिथुन शिसोदे सदर घटनेचा तपास करत आहेत .