DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
*साक्री :* साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक मध्ये बळीराजा विकास पॅनल ने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पॅनलचे प्रमुख नेतृत्व तथा धुळे जि. प. कृषी, पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्यासह नवनिर्वाचित संचालक प्रा.रविंद्र ठाकरे, मुकुंदराव घरटे, दिपक साळुंके, ऋतुराज ठाकरे, लादूसिंग गिरासे यांचा अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दहिते यांनी बळीराजा विकास पॅनलला मिळालेले यश हे सर्वांच्या मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले. याप्रसंगी महीर चे सरपंच रमेशभाऊ सरक, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पलतात्या नांद्रे, भाजपा चे तालुका सरचिटणीस प्रदिपकुमार नांद्रे, म्हसदी चे माजी सरपंच कुंदनआबा देवरे,देगांव चे उपसरपंच सुधीर अकलाडे, धमनार चे माजी सरपंच दिनेश सोनवणे, भाजपा ओबीसी मोर्चा चे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ देसले, नगरसेवक दीपकभाऊ वाघ, सामोडे विकासो चे चेअरमन रमेशआबा महंत, प्राथमिक शिक्षक पतसंस्था चे चेअरमन अनिलकाका शिंदे, आष्टाणे विकासो चे संचालक प्रविण देवरे, शेणपूर ग्रामपंचायत चे गटनेते सागर काकुस्ते, उद्योजक जितेंद्र सोनवणे, सतिश पगार, देसले आण्णा, सामोडे ग्रामपंचायत सदस्य अभय शिंदे, वासदरे चे पोलीस पाटील सुशील पाटील, कळंभीर चे सरपंच रितेश ठाकरे, भाजपा युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे, प्रतापपूर चे माजी सरपंच धनराज गांगुर्डे, सोनू सोनवणे आदी उपस्थित होते.