DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. प्रतिनिधी: नंदकिशोर मेश्राम. चंद्रपूर :- शहरातील कमला नेहरू कॉम्प्लेक्स मधील होलसेल लिकर व्यावसायिक खुशाल भागचंद अडवाणी यांच्या कार्यालयाच्या अलमारीत ठेवलेली 1,86,550 रुपये दोन दिवसानंतर बघितले असता रक्कम गहाळ दिसली दरम्यान अडवाणी यांनी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता माहिती न मिळाल्याने शहर पोलीस ठाण्यात 14 मार्च 2023 रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
शहर पोलिसांनी अपराध क्र.160/23 कलम 454,457, 380 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.
गुन्हे अन्वेषण पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक खुशाल अडवाणी यांच्या कार्यालयात दाखल होत कार्यालयात काम करणाऱ्या लेखापाल, कंप्युटर ऑपरेटर, ऑफिस बॉय अश्या 5 व्यक्तींचे बयान घेऊन संशयित वाटणाऱ्या व्यक्तीच्या मार्गावर तपास सुरू केला.
दरम्यान कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉय ची कसून चौकशी करीत पोलिसी खाक्या दाखवल्यावर गुन्हा कबुल केला. हर्षानंद लखाराम पाल वय 36 वर्ष रा. सिंधी कॉलोनी, रामनगर, चंद्रपूर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपिकडून गुन्ह्यात चोरलेली 176110/- रुपये, दुचाकी स्प्लेन्डर एम एच 34 ए जे 5398, गुन्हयात वापरलेला पेचकस असा एकूण 221210/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात सपोनि अतुल स्थूल गुन्हे अन्वेषण पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे, पोऊपनी संदीप बच्चीरे, सफो शरीफ शेख, पोहवा विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, नापोका संतोष पंडित, चेतन गजलवार, सचिन बोरकर, इर्शाद खान, इमरान खान, दिलीप कुसराम, खुशाल कावडे, रुपेश रणदिवे आदी गुन्हे शोध पथकाने केली.