DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे
दोन आचारीमधील भांडणामुळे,खुन झाल्याचा प्राथमिक अंदाज,,,
👉चौकशी करताना पोलीस अधिकारी👈
दोंडाईचा-: येथे आज सकाळी नंदुरबार रोडवरील १३२.केव्हीसमोरील सुभाष गणपत चौधरी यांचे राहते घर भाडेतत्त्वावर हाॅटेलसाठी दिले आहे. “पुष्पा राज’ ह्या दोन वर्षापुर्वी लाॅकडाऊनमध्ये सुरू झालेल्या जेवणाच्या हाॅटेलमध्ये एक मध्यप्रदेश राज्यातील, व्यवसायाने आचारी असलेल्या 54 वर्षीय वयाच्या इसमाचा चाकूने पोटात भोसकलेल्या अवस्थेत शव मिळून आला आहे.
सोमवारी सकाळी हा प्रकार बाजूला झोपलेल्या किशोरवयीन वेटरच्या लक्षात आल्यावर,त्याने बाहेर येऊन आरडाओरड करून पायी फिरणाऱ्या लोकांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर भाडेतत्त्वावर घर-हाॅटेल घेतलेले मालक व दोंडाईचा शहर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले होते.काल मध्यरात्री उशीरा एक वाजेनंतर हाॅटेल बंद केल्यावर हा खुनाचा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यात जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील एक वेटर रात्रीपासुन बेप्पता असुन त्याचा मोबाईल नंबर ही बंद येत आहे.तरी स्थानिक पोलीस सी.सी.टी.व्ही.फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहे.