DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – उमेश महाजन
एरंडोल – एरंडोल येथील जेष्ठ पत्रकार तथा अ. भा. ग्राहक पंचायतीचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव अहिरराव यांची जळगांव जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्यासंबधीचे जिल्हाधिकारी जळगांव अमन मित्तल यांचे ३० एप्रिल २०२३ अन्वये नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत. यापुर्वी देखिल प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्य म्हणून काम केलेले आहे. ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, विजय मोहरील आदींची देखिल निवड करण्यात आली.
सदरची निवड तीन वर्षासाठी करण्यात आली असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. एरंडोल वीज वितरण, वस्तु खरेदी, ट्रॅव्हल्स् कंपनी तक्रारी यशस्वी सोडवून न्याय मिळाला आहे. प्रा. शिवाजीराव अहिरराव यांच्या सुयोग्य निवडीचे अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.