DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – प्रशांत कोठावदे
सटाणा: तालुक्यातील चिराई येथील तरूण शेतकरी अविनाश अहिरे वय४१ यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश अहिरे यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती कसून आपल्या कुटुंबियांचा
उदरनिर्वाह करीत होते. बदलते हवामान, अवकाळी पाऊस, बँकेचे कर्ज, कांदा पिकाचे घसरते बाजारभाव तसेच शेतीपिकाला भाव मिळत नसल्याने विवंचनेत सापडले होते. यामुळे अहिरे यांचे आर्थिक गणित
कोलमडून पडले होते. खाजगी फायनान्स कंपनीचे १ लाख ५० हजार रुपये नातेवाईकांकडून हातउसणवार घेतलेले ५० हजार रूपये कर्ज फेडावे कसे या चिंतेत ते होते.
शेतात तीन एकर कांदा लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसाने कांदा शेतातच खराब झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते काल शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली. गळफास घेतल्याचे आजुबाजूच्या शेतक-यांच्या लक्षात
आल्यावर याबाबत कुंटुंबियांना कळविले ग्रामस्थांनी तातडीने जायखेडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरूषोतम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र
सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला तसेच महसूल विभागाचे तलाठी श्रीकृष्ण तिडके यांनी भेट दिली व वरीष्ठ कार्यालयात याबाबत अहवाल सादर केला जाईल अशी माहिती दिली. अविनाश यांच्यावर नामपुर येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. चिराई येथे अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाशच्या पश्चात आई,वडील,भाऊ वहिनी, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.