DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संदीप अहिरे
धुळे : भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त दि.१० रोजी सायंकाळी ७ वाजता येथील जलगंगा सोसायटी परिसरातील महामाया शुध्दोधन कॉलनीत भीम बुध्द सिल्वर समितीतर्फे अन्नदान, खीरदान व. वृक्षवाटपासह ११ दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन भीम-बुध्द सिल्वर समितीचे अध्यक्ष बॉबी पवार यांनी केले. गेल्या सोळा वर्षांपासून समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू पवार व राजश्री पवार हे दाम्पत्य बुध्द पौर्णिमा साजरी करत आहेत. यंदा रियाज अली यांच्या हस्ते बुध्दपूजा करण्यात आली. तसेच वर्षभरातील सर्व पौर्णिमा साजरी करणाऱ्या ११ दाम्पत्यांचा वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मुकुंदराव शिरसाठ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी राजू पवार, राजश्री पवार, बॉबी पवार, आम्रपाली पवार, छबाबाई पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी आयोजित महाप्रसादाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला.
कार्यक्रमाचे विधी संचालन बुध्दराज बैसाणे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार सुनील बैसाणे यांनी केले. कार्यक्रमासाठी डीडीएसबी ग्रुप, एसएसएस ग्रुप, भीम-बुध्द सिल्वर समितीचे अध्यक्ष बॉबी पवार व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.