DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी : राहुल आगळे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील मर्चंट बॅंकेचे वसुली अधिकारी बिपिन तांबोळी यांच्या कारचा शिरपुर, दहिवद गावाजवळ भिषण अपघात झाला. या अपघातात बिपिन तांबोळी हे जागीच ठार झाले. बिपिन तांबोळी हे सेंधवाकडून शिरपुरकडे त्यांच्या कार ने येत असतांना दहिवद गावाजवळ अचानक त्यांच्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या डिवायडरला धडकली. कार दोन तीन वेळा पलटी झाली. यात बिपिन तांबोळी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ते अंत्ययात्रेला हजेरी लावण्यासाठी कार ने नंदुरबारहून शिरपुरला गेले होते अशी चर्चा त्यांच्या परिवारात सुरू आहे. अपघात होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
बिपिन तांबोळी यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बिपिन तांबोळी यांच्या पश्र्चात भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.