नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाणी टंचाई बाबत आयुक्तांना निवेदन
येत्या आठ दिवसांत पाणी टंचाई प्रश्न निकाली काढा – रणजीत राजे भोसले
पाणी टंचाई प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस मनपावर काढणार हंडा मोर्चा

DPT NEWS NETWORK 🗞️✍️

धुळे – धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे महानगरपालिका व भाजपाच्या विरोधात पाणी टंचाई व पाणी समस्याबाबत शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

धुळे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या ढिसाळ व शून्य नियोजनामुळे शहरामध्ये पाणी वेळेवर येत नाही. वेगवेगळ्या परिसरामध्ये, कॉलनी, मोहल्यामध्ये आठ-दहा दिवसांनंतर तर काही ठिकाणी पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी सन 2018 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात / वचनात धुळेकर जनतेला दररोज पाणी देवू असे आश्वासन दिलेले होते. सन 2018 ते 2023 जवळपास साडेचार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी धुळेकर जनतेला वेळेवर पाणी मिळत नाही. भाजप व महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. महाराष्ट्र शासन व महाविकास आघाडी पाणीपुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेला शेकडो करोंडाचा निधी दिला. परंतु भ्रष्ट कारभारामुळे सदर योजना वेळेवर पूर्ण होवू शकत नाही. महानगरपालिका दोन ते चार पटीने घरपट्टी वाढवित आहात. पण वेळेवर तूम्ही जनतेला पाणी देवू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे. जे पाणी येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण असते. गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

सदर पाणी टंचाईचा प्रश्न हा येत्या आठ दिवसांत निकाली काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेत हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आला.
यावेळी रणजीत राजे भोसले, जोसेफ आण्णा मलबारी, गोरख शर्मा, भानूदास लोहार, यशवंत डोमाडे, भिका नेरकर, मंगेश जगताप, जगन ताकटे, राजू सोलंकी, संजय माळी, संजय नेरकर, डी.टी.पाटील, जितू पाटील, राजू चौधरी, रईस काझी, अमित शेख, शोएब अन्सारी, सोनू घारु, शेख समद, मसुद अन्सारी, बरकत शहा, भटू पाटील, एजाज शेख, विशाल केदार, चेतन पाटील, सागर चौगुले, भूषण पाटील, शकीला बक्ष, मंगला मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:08 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 41 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!