नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिकअप दरीत कोसळल्याने चार जण जागीच ठार

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – संजय गुरव

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात चांदसैली घाटात घडलेल्या भयंकर अपघातात पिकअप दरीत कोसळल्याने चार जणांचे जागेवरच दुःखद निधन झाले आहे व तीन जण गंभीर झाले असुन त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अपघात एवढा भयानक होता की त्याचा आवाजाने चांदसैली घाटात भितीचे वातावराण निर्माण झाले होते.
धडगाव तालुक्यात जाणारे रस्ते विशेष करुन घाटातुनच आहेत. यात चांदसैली हा घाट वाहतुकीसाठी खुपच भयानक आहे. पिकअप MH 43 AD -1818 या वाहनाचा भयंकर अपघात याच घाटात घडला आहे. चांदसैली घाट हा संपुर्णपणे नागमोडी रस्त्यांचा व उतार चढावचा आहे. सदर पिकअप तीन चार पलटी खात वळणाचा बाजुला असलेल्या दरीत कोसळली या भयानक रीत्या झालेल्या अपघातामध्ये तुकाराम दिवल्या ठाकरे (वय – 25) अमरसींग शंकर ठाकरे (वय – 30) मुकेश तेजला ठाकरे (वय – 22) तीन्ही राहणार वावी ता.धडगाव तसेच विरसींग रमेश पावरा (वय – 35) राहणार बोदला ता.धडगाव यांचा जागेवरच मृत्यु झालेला आहे. अपघातात जखमी झालेले वसंत साकऱ्या ठाकरे (वय – 32) स्वरुपसींग साकऱ्या ठाकरे (वय – 20) गणेश साकऱ्या ठाकरे (वय – 15) यांना तळोदा तालुक्यातील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.
धडगाव तालुक्याचा हा मार्ग नंदुरबारला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर राहदारी व वाहनांनी भरालेला असतो. या भागात प्रवाश्यांची व वाहतुक जास्त होत असते. गेल्या दोन वर्षापासुन या रस्त्यांची अवस्था अती दयनीय झालेली आहे. खुप काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे व या कारणामुळे छोटे मोठे अपघात घडत असतात. हा अपघात सुध्दा याच परिस्थितीत घडलेला आहे असे वर्तवले जात आहे. अजुन प्रशासन किती लोकांचा जीव घेणार आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. सदर अपघातात चार तरुणांचा जागेवरच मृत्यु झाला तर तीन तरुणांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!