DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – कृष्णा पाटील
वडणे:- शिंदखेडा तालुक्यातील आमदार तथा माजी मंत्री मा जयकुमार रावल यांनी दिनांक १७-०५-२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविलेल्या बैठकीचत झालेल्या चर्चेनुसारआज दिनांक २३-०५-२०२३ रोजी सवाई मुकटी शिवारातील शेतकरी मनोहर सोमा चौधरी यांच्या शेतापासून लाईन आउटचे काम हाती घेण्यात आले. धुळे मध्यम प्रकल्पचे कार्यकारी अभियंता पी. जी. पाटील यांच्या आदेशानुसार कनिष्ठ अभियंता राणे, सगळे, राऊत यांनी चिमठाणे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांच्या उपस्थितीत वाडी शेवाडे उजवा कालव्याच्या लाईन आउट टाकण्याचे कामास सुरुवात केली. त्यादरम्यान काही शेतकऱ्यांच्या अडचणी वरील अधिकारी यांनी समजून घेतल्या. यावेळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती रविंद्र नाना देसले, सरपंच मनोज सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य सुखदेव राजपुत, नंदू देसले, तुषार देसले, दारासिंग गिरासे, विक्की मोरे, चिमठावळ सरपंच शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंकज नागमल, राजेंद्र मराठे तसेच दराने, रोहाने, सवाईमुकटी, चिमठावळ येथील शेतकरी उपस्थित होते.