DPT NEWS NETWORK 🗞️✍️
न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. आता ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या करीता विविध नेत्यांकडून मागणी होत आहे. जर असा कोणत्याही राजकीय पक्षाचे अगर शासनाचे लोकांच्या मागणीप्रमाणे ओबीसी धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास, महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे दिलीप आप्पा देवरे मा. नगरसेवक यांनी केले आहे.
वास्तविक पाहता ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून मराठ्यांना आरक्षणासाठी पाठींबा दिला होता. आता मराठा समाजातील काही नेते मंडळी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहे.
सर्वोच न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलेले आहे. मराठ्यांना शासनाने स्वतंत्र आरक्षण द्यावे, त्यास आमचा विरोध नाही. भविष्यात ओबीसी व मराठा असा संघर्ष होता. कामा नये, त्यासाठी शासनाने त्या दृष्टीने पावले उचलावीत व ओबीसी आरक्षणास धक्का लावण्याचे काम कोणीही करु नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.