DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भाडणे गावात एकाच रात्री सहा घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे परिसरात परत एकदा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने एकच खळबळ उडाली आहे.
साक्री तालुक्यातील भाडणे गावात प्रथमच सहा घरपोडया झाल्याने गावातील नागरिक भयभीत झाल्याचे सांगण्यात येत आहे, भाडणे येथील भरत मधुकर देसले व किशोर मधुकर देसले हे लग्न निमित्त धुळे येथे गेले असता रात्री घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी १० तोळे सोने व ४० हजार रुपये लंपास करून घरातील सर्व वस्तू व कपडे फेकूण पसार झालेत, चोरांनी पुढे आपला मोर्चा भाडणे गावातीलच नथू सुकलाल सोनवणे व त्यांच्या पत्नी हे दोघेही वयोवृद्ध गच्चीवर झोपल्याचे संधीचा फायदा घेत चोरट्यांनी खालच्या घरात डल्ला मारून ७० हजार व ५ ग्रॅम सोन्याची अंगठी घेऊन पसार झाले, अशाच पद्धतीने चोरट्यांनी गावातील अजून चार घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी घरात काहीच न मिळाल्यामुळे त्या ठिकाणाहून पसार झालेत, घटनेची खबर साक्री पोलिसांना दिली असता त्यांनी तात्काळ डॉग्स स्कॉड व फिंगरप्रिंटचे पोलीस अधिकारी यांना पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता डॉग्स स्कॉड ने कारखाना फाट्याजवळ चौफुली पर्यंत दिशा दाखवल्याचे माहिती प्राप्त झाली आहे पुढील तपास साक्री पोलीस करीत असून त्यांच्यापुढे पुन्हा एकदा चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.