DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
*साक्री :* साक्री शहरातील क्लासिक फोटो स्टुडिओ येथे साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आज दि. २७ मे रोजी त्यागमूर्ती रमामाता भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी 11 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यागमूर्ती माता रमाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून साक्रीचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र देशमुख साहेब व मान्यवर म्हणून प्रा. डॉ. कैलास वाघ, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ, प्रा. दिलीप पानपाटील ,डॉ दिलीप लोखंडे, अनिल मगर, नाना वाघ,शेवाळी, एल एच पानपाटील, आर डी साळवे, डीएम मोहिते उपस्थित होते.
याप्रसंगी जन ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा संघटक तथा मुख्याध्यापक विद्यानंद पाटील सर, साक्री तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, उपाध्यक्ष अकील शहा, वरिष्ठ पत्रकार शरद चव्हाण, शहराध्यक्ष जितेंद्र जगदाळे, उपशहराध्यक्ष संघपाल मोरे, नाना ढालवाले, सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर शिवदे, जितेंद्र गुरव, प्रवीणदादा पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.