नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील ११लाखाचे विना परवाना बियाणे जप्त

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी : राहुल आगळे

शहादा : शहादा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नंदुरबार जिल्ह्यातीत मोठी कारवाई केली आहे गुजरात राज्यातील बडोदा येथील विनापरवाना येणारे ११लाख किंमतीचे ८५७ पाकीट कापूस बियाणे कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून पकडले हि कारवाई नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या सिमेवर सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई केली असून बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्याचे धाबे बसवले आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रमाणित नसलेले बियाणे कमी किंमतीत किंवा ऊधारीने देण्यात अमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे राज्यात कृषी विभागातर्फे प्रमाणित बियाणे आहे त्या किंमतीत विक्री व्हावेत यासाठी कृषी विभागाने लक्ष ठेवून जिल्हा तालुका स्तरावर पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी देखील काही महाभाग प्रमाणित नसलेले बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशीच कारवाई कृषी विभागाने करून बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांना धक्का दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की.
नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील सीमेवरील शहादा तालुक्यातील सारंखेडा पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 26 रोजी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना विनापरवाना कापूस बियाणे खाजगी वाहनाने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रक त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील व शहादा तालुका कृषी अधिकारी योगेश हिवराळे, अभय कौर यांनी पोलीसांच्या मदतीने सापळा रचला. वाहन (क्र.जी जे ६ -पीसी ३५३२) वाहन अडविले अस्ता वाहन चालक चंद्रकांत पांडुरंग माळी (रा कळंबू ता. शहादा) याने विनापरवाना बियाणे गुजरात राज्यातील बडोदा जिल्ह्यातून आनल्याचे कबूल केले. विभागीय कृषी संचालक नाशिक विभाग, नाशिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे,जि.प.कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे तसेच तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या परवानगीने पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे सदर वांहणात एकूण१३ पोते (८५७ पाकीटे ) होते त्याची अंदाजित किंमत ११ लाख असून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.कृषी विभागाने केलेल्या या कारवाईचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:59 pm, January 13, 2025
temperature icon 25°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 12 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!