DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनीधी – संजय गुरव
शहादा :- महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवरील पानसेमल क्षेत्र अंतर्गत खेतीया पानसेमल रोडवर असलेल्या मेन्द्राना गावाजवळ असलेल्या दुर्गा साखर खांडसरीला दि. 30 रोजी दुपारी 2.00 ते 3.00 वाजेच्या सुमारास भिषण आग लागली होती. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झालेली नाही. पण लाखो रुपयांचे नुकसान झालेले दिसुन आले. आग विझवण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश विभागातुन पानसेमल, खेतीया, बडवानी, शहादा, दोंडाईचा अश्या विविध भागातुन अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले होते. रात्री उशीरा पर्यंत आग विझवण्याचे कार्य सुरु होते. अग्नीशामक दलाचे बंब कमी पडल्याणे गुजरात मधुन सुध्दा बंब आग विझवण्यासाठी मागवण्यात आले होते. आगीची तिव्रता अधीक असल्याने आगीचा लोळ उसळत होता. आग कोणत्या कारणाने लागली याचे स्पष्टीकरण अजुन दिसुन आलेले नाही. खांडसरीचा मागच्या बाजुला जो भुस्सा होता तो आगीमुळे पुर्णपणे जळून खाक झालेला आहे. आजु बाजुच्या परिसरातील असलेल्या गावांना पोलीस व प्रशासना तर्फे सावध राहण्याचे संकेत देण्यात आले होते. मध्यरात्री पर्यंत आग विझवण्याचे कठीन कार्य पोलीस व प्रशासन व अग्नीशामक दला मार्फत सुरु होते.
शहादा तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या मंदाणे गावाहून जवळ जवळ सहा किलो मिटर अंतरावर महाराष्ट्राच्या सीमे जवळ मध्यप्रदेश राज्यात खेतीया इंदोर महामार्ग आहे. याच ठिकाणी मेंद्राना गावाजवळ दुर्गा साखर खांडसरी आहे. हा साखर कारखाना खुप जुना आहे तसेच त्या ठिकाणी महाराष्ट्रातुन शहादा, नंदुरबार व तळोदा तसेच इतर विभागातुन उस पोहोचवला जातो. मध्यप्रदेश विभागातील बऱ्याच ठिकाणाहून उस तेथे पोहोचवला जातो. जवळच्या भागातील शेतकऱ्यांना सोयीचे असल्याने दरवर्षी लाखो टन उसाचा पुरवठा या दुर्गा साखर खांडसरीत पुरवठा केला जातो. दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन या ठिकाणी होत असल्याने अनेक अधीकारी व कर्मचारी तसेच मजुर वर्ग या ठिकाणी कामं करतात. सध्या ऊस उत्पादनाचा हंगामा सुरु आसल्याने अधीकारी व कर्मचारी वर्ग जास्त असतात. हंगामा सुरु असल्याने व कामे अधीक असल्याने कर्मचारी शीफ्ट नुसार कामे करतात.
काल मंगळवारी नियमित प्रमाणे कामे सुरु होते. परंतु अचानक दुपारी 2.00 ते 3.00 वाजे दरम्यान भिषण आग लागली. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. दुपारी कडक उन असल्याने खांडसरीचा मागच्या बाजुला असलेला भुसा कोरडा होता व त्यास आग लागल्यामुळे भुसा पुर्णपणे जळून खाक झाला आहे. भूसा जळाल्याने आगीने प्रचंड रौद्र रुप धारण केले होते.
समय सुचकता दाखवत मील मधील अधीकारी व कर्मचारी वर्गांला सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आले होते. अग्नी विषयी माहीती मिळताच संबंधित आधीकारींनी तत्काळ महाराष्ट्र व मध्य प्रदेश विभागातील जवळच्या क्षेत्रातील अग्नी शामक दलाना फोनवर सुचवले. अग्नी शामक दलांनी कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालता तातडीने घटनास्थळी पोहोचले. मध्यरात्री पर्यंत अग्नीशामक दलचे बंंबा येत होते व आग विझवण्याचे कार्य तेथील अधीकारी,पोलीस प्रशासन व अग्नीशामक दल मिळुन युध्द पातळीवर करत होते.