DPT NEWS NETWORK 🗞️✍️
*शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे*
नंदुरबार :+ नंदुरबार जिल्ह्यात अतिक्रमण हटाव मोहीम, मालमत्ता व संस्था वरील कर थकबाकी बद्दल केलेली कारवाई करण्या बाबत चर्चेत राहिलेले नंदुरबार पालिकेचे अधिकारी तत्कालीन परीक्षाविधीन मुख्याधिकारी १२ जून पासून पुन्हा एकदा नंदुरबारात येतं आहेत. यावेळी नंदुरबार तहसीलदार पदी एका महिन्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नंदुरबार महसुल मध्ये ते आता कशी कामगिरी करतात याकडे नंदुरबार तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेले परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पुलकित सिंग यांनी केलेल्या दबंग कामगिरीमुळे ते चर्चेत राहिले. यात त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शहरातील मुख्य रस्ते मोकळे केले. कोणताही राजकीय दबाव न ठेवता त्यांनी केलेली या कारवाईचे सर्वांनीच स्वागत केले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कर थकवलेल्या मालमत्ता धाकरकांच्या दुकान सील ठोकण्याचे काम करून त्यांनी पालिकेच्या तिजोरीत दोन ते अडीच कोटीचा महसून मिळवून दिला. त्यांच्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असताना त्यांच्या या पदाचा एका महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला.
नंदुरबार मुख्याधिकारी पदाचा परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुलकित सिंग यांची अक्कलकुव्यात गटविकास अधिकारी म्हणून महिन्याभरासाठी नियुक्ती करण्यात आली. याठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. गटविकास अधिकारी म्हणून काम पाहतांना श्री. सिंग यांनी आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी केंद्रांसह अनेक विभागांना अचानकपणे भेटू देऊन आढावा घेत सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत का? याची तपासणी केली. या ठिकाणी महिनाभरात त्यांनी आपल्या आयएएस दर्जाचे अधिकारी काय काम करू शकतात हे दाखवून दिले. अक्कलकुवा गटविकास अधिकारी पदाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना श्री. सिंग यांची पुन्हा नंदुरबारात नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक महसूल विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुलकित सिंग यांची नंदुरबार तहसीलदार पदी नियुक्ती केली आहे. श्री. सिंग हे परिक्षाविधीन तहसीलदार म्हणून १२ जून रोजी आपला पदभार स्वीकारतील. १२ जून ते १४ जुलै असा एक महिन्याचा त्यांचा कार्यकाळ असून या काळात ते नंदुरबार महसुल मध्ये कशी कामगिरी करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.