DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन
एरंडोल- एरंडोल तालुक्यातील नांदखुर्द बु.|| येथील सरपंच व ग्रा.पं. सदस्य पती यांनी बखळ जागेत घर बांधले असल्याची तक्रार नांदखुर्द बु|| ग्रा.पं. सदस्य यांनी केलेली असून यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा विस्ताराधिकारी यांनी सुद्धा त्यांना साथ दिल्याची तक्रार केलेली असून सदर लोकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान ग्रा.पं. सदस्य नांदखुर्द बु. विनायक नागो पगारे यांनी दिलेल्या तक्रारीत दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी सरपंच मथुराबाई उत्तम सोनवणे व त्यांचे पती ग्रा.पं. सदस्य उत्तम सुका सोनवणे यांनी जबाबात कोणतेही कागदपत्रे पुरावे सदर दिवशी सादर केलेले नव्हते. परंतु विस्ताराधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे यांनी सदर सरपंच सदस्य यांना हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करून नंतर २० फेब्रुवारी २०२३ रोजी करारनामा घेतला असल्याची तक्रार केली आहे. तक्रारीत नांदखुर्द बु. येथील ग्रा.प.मालमत्ता क्र. १८९ ही जागा मथुराबाई हिलाल पाटील यांचे नावे असून परंतु विस्तार अधिकारी सपकाळे यांनी दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी करारनामा घेऊन सदर जागा सरपंच मथुराबाई सोनवणे व त्यांचे पती उत्तम सोनवणे यांनी भाड्याने घेतलेली आहे अशी दिशाभूल करून बखळ जागा बांधीव आहे असे चुकीचे दाखविले आहे. सदरचा करारनामा हा तालुका दंडाधिकारी यांच्या समक्ष स्वाक्षरीचा घेतलेला नाही किंवा नोटरी केलेला नाही. सदरचा करारनामा नियमाविरुद्ध घेतलेला असल्याचे म्हटले आहे तसेच सरपंच मथुराबाई सोनवणे व त्यांचे पती उत्तम सोनवणे यांनी ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक १२६ चुकीचे दाखवून ग्रामपंचायत गावठाण जागेवर बांधलेले पक्के घर बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे. त्याचा मालमत्ता क्रमांक १८९ सोबत कोणताही संबंध नसून मथुराबाई पाटील यांनीही सदर जागा बखळ असताना खोटा करारनामा करून दिला आहे असे म्हटले आहे. तक्रारीत शेवटी सरपंच मथुराबाई सोनवणे त्यांचे पती उत्तम सोनवणे गटविकास अधिकारी दादाजी जाधव व विस्तार अधिकारी रवींद्र सपकाळे यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल करून केलेली आहे तरी सदर अतिक्रमणामुळे सरपंच मथुराबाई सोनवणे व त्यांचे पती उत्तम सोनवणे यांना अपात्र करण्यात येऊन सर्वांवर कारवाई व्हावी असे नमूद केले आहे.