DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन
एरंडोल – एरंडोल येथील गांधीपुरा भागातील एका पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी व कुऱ्हाड घालुन खून केल्याची घटना १९ जुन रोजी दुपारी एक वाजता घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की एरंडोल येथील गांधिपुरा भागातील किरण महादू मराठे ( वय ३५ ) याने त्याची पत्नी हर्षदा किरण मराठे ( वय २७ ) हिच्या डोक्यात फरशी घालुन खून केला.दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून दोघं पती पत्नी मध्ये टोकाचे वाद सुरु असल्याचे समजते.जुना वाद जास्त वाढल्याने संतप्त पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घालुन खून केला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतिष गोराडे आपल्या सहकाऱ्यां सोबत घटना स्थळी हजर झाले त्यांनी जखमी हर्षदा हिस ग्रामीण रुग्णालयात हलविले तीस मृत घोषित केले व त्यांनी संशयित आरोपी किरण मराठे यास ताब्यात घेतले असुन पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान मराठे दांपत्यास एक पाच वर्षाचा मुलगा व सात वर्षाची मुलगी आहे.