DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडक टेल्स वेबसाईट कंपनी विरोधामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
इंडक टेल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कामाबद्दल इंडक टेल्स यांच्या लेखात अतिशय अपमानकारक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे.हे अत्यंत वेदनादायक आहे. शिव, फुले, शाहू,आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा प्रकार अतिशय संताप जनक आणि घाणेरडा असून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या पोर्टलवर इतिहासाची पुनर मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरू आहे. महापुरुषांबद्दल इतिहासाची मोडतोड करून लिखाण करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची गरज आहे.यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याबाबतचा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन आक्षेपार्य लेखन करणाऱ्या वेबसाईट कंपनीवर बंधने बंदी आणली पाहिजे. तसेच सदर अवमान कारक लेख लिहिणाऱ्या वेबसाईटवर तसेच लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळासमोर घोषणा देऊन आंदोलन केले. तसेच सदर कंपनीवर त्वरित बंदी आणावी. अशी मागणी केली. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजीत राजे भोसले, जगन ताकटे, रईस काझी, महेंद्र शिरसाट, जितेंद्र पाटील, राजेंद्र सोळंकी, भगवान भाऊ वाघ, राजेंद्र चौधरी, चेतन पाटील, सरोज ताई कदम, स्वामिनी पारखे,गोलू नागमल, रामेश्वर साबळे, नुरुद्दीन शहा,समद शेख, अमित शेख,संजय नेतकर आदीं पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.