नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुर, आक्षेपार्ह स्टेटस व व्हायरल केल्यामुळे दोन धर्मात तणावग्रस्त वातावरण, जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी…

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापूर:- कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस व व्हायरल केल्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे तेथील परिस्थिती चिघळलेली असल्यामुळे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोस्ट व्हायरल व स्टेटस ठेवल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. व त्यामुळे जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियमन, 1951(The Maharashtra Police Act,1951) चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी करणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी त्यांच्याकडील क्र.जीवीशा/मपोका/बंदी आदेश/2653/2023 दि. 06/06/2023 रोजीच्या अहवालाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. ज्या अर्थी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसा आदेश जारी करणे जरुरीचे आहे अशी पोलीस अधीक्षक यांना खात्री झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियमन, 1951(The Maharashtra Police Act,1951) चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश दि. 06/06/2023 रोजी सायंकाळी 18.00 वाजेपासून ते दिनांक 19/06/2023 रात्री 24.00 वाजेपर्यंत खालील वर्तन करण्यास मनाई केले आहे.

कलम – 37(1) अ ते फ :- अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतेही वस्तू बरोबर नेणे.
ब) कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
क) दगड किंवा इतर क्षेत्रनात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.
ड) व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन.
इ) जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे.
फ) ज्यामुळे सभ्यता अथवा नीतिमत्ता या धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेस प्रसार करणे.

कलम 37 (3) :-
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे जमाव जमविणे मिरवणुका काढणे व सभा घेणे.

हा बंदी आदेश हुकूम ज्या सरकारी अधिकारी/ कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजविण्याचे संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम अधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती-धर्माचे सण उत्सव जयंती यात्रा इ. हे सर्व शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न इतर धार्मिक समारंभ सण यात्रा प्रेत यात्रा इत्यादींना लागू असणार नाही. असा आदेश दिनांक 06/06/ 2023 रोजी सायंकाळी 18.00 वाजेपासून ते दिनांक 19/0 6/ 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत अमलात राहील सदरचा आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाने व सही निशी काढण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:46 am, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!