DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिनाज सनदी
कोल्हापूर :- नाशिक शिक्षण विभागातील कारवाई चर्चा लोकांच्या कानावरून जात नाही तोवर कोल्हापूर शिक्षण विभागात कारवाई झाली महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला जणू भ्रष्टाचाराची किडच लागली आहे की काय असेच पहायला मिळत आहे. तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थे अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या वेगवेगळे दोन कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस करिता आवश्यक त्या सोयी सुविधा आहेत अगर कसे याची तपासणी करून प्रमाणपत्र देणेसाठी तक्रारदार यांच्याकडे कोल्हापूर उच्च शिक्षण विभागातील प्रवीण शिवाजी गुरव . वय-32 वर्षे, पद- उच्च श्रेणी स्टोनो ग्राफर. वर्ग 02 यांनी त्यांचे वरिष्ठ
विभागीय सह संचालक, (उच्च शिक्षण) कोल्हापूर हेमंत नाना कठरे. वय- 46 वर्षे,वर्ग 01 यांच्यासाठी प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात 50 हजाराची लाचेची मागणी केली. व तडजोडंती तीस हजार रुपये लाच देण्याचे ठरले.
ठरलेली तीस हजार रुपये रकमेची लाच स्टोनो ग्राफर प्रवीण शिवाजी गुरव यांनी कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग. वय – 34 वर्षे, पद- कनिष्ठ लिपिक वर्ग 03 रा.राशिवडे, ता.राधानगरी, जि. कोल्हापूर यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यालाचेची रक्कम विभागीय सह संचालक, (उच्च शिक्षण) कोल्हापूर हेमंत नाना कठरे यांनी लाच रक्कम कनिष्ठ लिपिक यांच्याकडे देणेस सहमती दर्शवली व त्यानंतर कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपयाची रोख रक्कम लाच स्वीकारली ती स्वीकारताना कोल्हापूर एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.
हा सापळा यशस्वी करण्यासाठी सरदार नाळे, ला.प्र.वि. उपअधीक्षक, कोल्हापूर. (मोबा.9673506555) यांच्या आदेशाने ASI – प्रकाश भंडारे,
पोहेकॉ /983/ विकास माने, पोहेकॉ /1480/सुनिल घोसाळकर, पोकॉ / 474/ रुपेश माने, पोकॉ /903 / मयूर देसाई,
पोकॉ /2363/ संदीप पवार, पोकॉ/2608/ उदय पाटील ला.प्र.वि.कोल्हापूर यांनी सापळा यशस्वी करून कारवाई पार पाडली. सदर कारवाई
अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाप्रवि,पुणे. (मोबा.9922100712) 2)श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवी पुणे (मोबा.9921810357)
2) विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे.
(मोबा. 9607323232) यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.