नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वन विभागातील महिला सहाय्यक वनरक्षकासह वाहन चालक 60 हजाराच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

DPT NEWS NETWORK 🗞️✍️

पालघर :– 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक महिला अधिकार्‍यासह वाहन चालकाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. महिला अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

वर्षाराणी राजाराम खरमाटे (40, पद – सहाय्यक वनसंरक्षक, वाडा उपविभाग, वाडा (वर्ग-1) आणि मुरलीधर शांताराम बोडके (58, खाजगी वाहन चालक, रा. वाडा, जि. पालघर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी हक्क / निर्गत दाखला मंजुर करून देण्याच्या मोबदल्यात वर्षाराणी राजाराम खरमाटे आणि मुरलीधर शांताराम बोडके यांनी तक्रारदाराकडे 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रार पडताळणी करताना वर्षाराणी खरमाटे आणि मुरलीधर बोडके यांनी 60 हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप, पोलिस निरीक्षक स्वपन बिश्वास, पो.ह. संजय सुतार, निशा मांजरेकर, नितीन पागधरे, योगेश धारणे, पोलीस अंमलदार सखाराम दोडे आणि स्वाती तारवी यांच्या पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:03 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!