DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी : अकिल शहा
जैताणे : निजामपूर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघा संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांना धुळे बालसुधार गृहात रवाना केले.
यासंदर्भात,13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची मुलगी गावात क्लासला जात असताना गावातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील चौघांकडून तिचा रस्ता अडविणे, हातवारे करणे, तिचा मानसिक छळ करणे असा प्रकार सुमारे एक वर्षापासून सुरू होता. त्यातील एक जण मुलीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी बोल नाहीतर घरात येऊन मारहाण करू अशी धमकी देत होता. दि. ३० मे रोजी मुलगी क्लासला जात असतांना एकाने तिच्या समोर २० रुपये फेकून तिला चॉकलेट आणण्यासाठी धमकी दिली. त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून मुलीने चॉकलेट घेऊन त्यांना दिले तरी देखील त्यांनी त्रास देणे बंद केले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून चौघांविरुध्द भादवि कलम ३५४ डी, ३४१, ५०६, ३४, बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम १२ व १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सपोनि हनुमंत गायकवाड यांनी चौघा संशयितांना अटक केली. ते अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी धुळे बाल सुधारगृहात करण्यात आली आहे, अशी नाही तर घरात येऊन मारहाण माहिती पोलिसांनी दिली.