DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी : नंदु मेश्राम
चंद्रपूर :- कर्तव्यावर असताना बिअर शॉपमध्ये जाऊन मद्यप्राशन करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
ब्रह्मपुरी येथे जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन सुरू असताना त्यातील ३ कर्मचारी बिअर शॉपीमध्ये गेले आणि मद्यप्राशन करत बसले. तर त्यामधील १ कर्मचारी उभा होता. याची माहिती ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना मिळाली असता त्यांनी तत्काळ त्या विर
शॉपीकडे मोर्चा वळवला वळीची येथील पोलीस कर्मचारी उमेश मस्के व नरेश निमगडे यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांना पुढील माहिती दिली. याबाबत चौकशी करण्यात येऊन पोलीस अधीक्षकानी उमेश मस्के व नरेश निमगडे या दोघांना शुक्रवारी एका आदेशाद्वारे निलंबित केले.