DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशन च्या हद्दीत अवैधरित्या दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी साहेब यांना बातमी दाराकडून मिळाली होती ,गुप्त माहितीच्या आधारावर आज सकाळी एपीआय पारधी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असई बी.आर. पिंपळे, पोहेकॉ ३६६ चोधरी, पोकॉ १४६५ आकाश माळी, पोकॉ पंकज माळी, चालक पोकॉ १५७१ पंकज वाघ आदि पोलीस कर्मचारी पथकाने सापळा रचून कारवाई केली.
दि.२०जून २०२३ रोजी सकाळी ०६:२५ मिनिटांनी एपीआय श्रीकृष्ण पारधी साहेब आपले सहकारी कर्मचारी यांना घेऊन ०६:३० दरम्यान रवाना झाले. गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाल्यानुसार पिंपळनेर ते नवापूर रोडवरील उमरपाडा गावाजवळ सकाळी सात वाजता संशयित वाहन क्रमांक एम.एच ०५ ए.जे ७५७९ थांबवून वाहन चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने सुरज सुदाम वळवी (२३) रा. वार्सा पो वार्सा ता. साक्री जि. धुळे सांगितले सदर वाहन चेक केले असता मागील डिक्कीत खालील प्रमाणे अवैधरित्या देशी-विदेशी दारू मिळून आली.
१)१३४४०/- रुपये किमतीचे चार बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये ४८ टॅंगो पंच दारू प्रत्येक बाटली १८० एम एल च्या एकूण १९२ बाटल्या प्रत्येक बाटली ची किंमत ७० रुपये प्रमाणे
२)१५३६०/-रुपये किमतीचे दोन बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये ४८इपेरियल ब्ल्यू विदेशी दारू असलेले एकूण ९६ बाटल्या प्रत्येकी बाटली १८० एम एल च्या प्रत्येकी कि १६० रुपये प्रमाणे.
३)६२४०/-रुपये किमतीचे हाय वर्ड ५०० बियर एकूण ४८ बाटल्या प्रत्येकी बाटली ५०० एम एल च्या प्रत्येकी १३० रुपये प्रमाणे.
४)१,०००००/_रुपये किमतीची Fiat कंपनीची कार क्रमांक MH ०५ AJ ७५७९ जु. वा. की.१,३५,०४०/- एकुण.
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोकॉ.६२ पंकज माळी यांच्या फिर्यादीनुसार सदर वाहन चालकावर महाराष्ट्र प्रोव्हिशन ॲक्ट कलम ६५(अ) व (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलिसांनी अवेधरित्यादारू वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई केल्यामुळे पिंपळनेरसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.