DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
*साक्री:- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी येथे दिनांक 29 जून 2023 रोजी भव्य दिव्य दिंडी पालखीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पासून पावसाने हजेरी लावली असताना देखील सकाळी आठ वाजेपासून भजनी मंडळाच्या वतीने दिंडी पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले दुपारच्या वेळेस वरुण राजाने काही काळ विश्रांती घेतली असता गावात ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने पालखी मिरवणूक काढून संपूर्ण परिसर भक्तीमय करण्यात आला यावेळी गावातील माता-भगिनींच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली ,विठ्ठल रुक्मिणीच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीचे स्वागत केले, गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने भजने कीर्तने म्हणत आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.