DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रमजान मुलाणी
सांगली : महाराष्ट्रात दररोज वृत्तपत्र उघडले की कुठे ना कुठे सरकारी अधिकाऱ्यांना कडून लाचेची मागणीचे व लाच स्वीकारताना चे बातम्या नेहमी वाचायला मिळतात. तरीदेखील भ्रष्ट अधिकारी नेहमी लाचेची मागणी करतच असतात.असाच प्रकार सांगली येथे घडला. फायर फायटिंग सिस्टीम बसविल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात एक लाख 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगली महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यास रंगेहात एसीबीने पकडले. विजय आनंदराव पवार (वय 50 रा. संभाजीनगर, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टिंबर एरिया येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात मंगळवारी सापळा लावून ही कारवाई केली. तक्रारदारांच्या कंपनीकडून फायर फायटिंग सिस्टीम बसविण्याचे कामे केली जातात. अशाच एका कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात अग्निशमन विभागाचे अधिकारी पवार यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कंपनीकडून करण्यात येणाऱ्या पुढील कामाची दाखले देणार नाही असेही पवारांनी सांगितले होते त्यामुळे तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती पवार याने दीड लाख रुपयांची मागणी करत तडजोड अंती सव्वा लाख रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
मंगळवारी टिंबर एरिया येथील अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयात एसीबीने सापळा रचून लाचेची सव्वा लाखाची रक्कम स्वीकारताना अग्निशमन अधिकाऱ्यास रंगेहात पकडले भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अजित पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रवींद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.